Ad will apear here
Next
नक्षलग्रस्त
महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा, जिल्ह्यांत नक्षलवादाने चांगलेच पाय रोवले आहेत. नक्षलवाद म्हणजे नेमके काय, त्याचे मूळ स्वरूप व सध्याची वाटचाल, आदिवासी जनतेवर होणारे अत्याचार याचे दाहक चित्रण प्रतिमा इंगोले यांनी ‘नक्षलग्रस्त’ या कादंबरीतून केले आहे.  

पत्रकार असलेली रागिणी नक्षलवाद जाणून घेण्यासाठी नक्षलग्रस्तांचा प्रभाव असलेल्या गावांमध्ये, जंगलात फिरते. त्या वेळी नक्षलवाद्यांचा खरा चेहरा तिच्यासमोर येतो. सरकार, पोलीस यांच्याकडून आदिवासींवरील अन्यायाविरोधात नक्षलवादी चळवळ उभी राहिली असली, तरी आदिवासींना त्यांचे भय वाटत असे. तेंदूपत्ता गोळा करण्यावरील राजकारणात आदिवासींचा रोजगार हिरावला जातो; पण पोलीस आणि दहशतवादी यांच्याकडून होणारा अन्याय ते बिचारे सहन करत रोजचा दिवस पुढे ढकलत असतात. 

नक्षलवाद्यांच्या दलममध्ये महिलांना समान संधी देत असल्याचा दावा किती फोल आहे हेही रागिणीच्या लक्षात येते. पुरुष नक्षलवाद्यांकडून होणारा बलात्कार, अत्याचार त्यांना सहन करावे लागतात. नक्षलवाद, राजकारण असा दुहेरी वावर असलेल्या नेताजी मडवी याची चित्तरकथाही यात आहे. 
     
पुस्तक : नक्षलग्रस्त 
लेखक : डॉ. प्रतिमा इंगोले
प्रकाशक : सोनल प्रकाशन
पाने : २०८
किंमत : २०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZQSCA
Similar Posts
वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास लोकगीतांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. लिखितपेक्षा याचे स्वरूप मौखिक असते. लोकगीतांमधून लोकजीवनाचे, संस्कृतीचे प्रतिबिंब पडते. त्यामुळे लोकगीतांमधून संस्कृती व समाजाचा अभ्यास करणे शक्य होते. प्रतिमा इंगोले यांनी वऱ्हाडी लोकगीतांच्या आधारे वऱ्हाडी समाजजीवनाचा अभ्यास केला. ‘वऱ्हाडी लोकगीतांचा चिकित्सक
बोडखी ‘बोडखी’ या कादंबरीचा अल्प परिचय...
बोलू ‘बोली’चे बोल! - वऱ्हाडी बोली - डॉ. प्रतिमा इंगोले (व्हिडिओ) २०१९ या आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्षाच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने काही बोलीभाषांचा वेध घेणारा ‘बोलू ‘बोली’चे बोल!’ हा उपक्रम राबवला होता. लॉकडाउनच्या काळात वेळ हाताशी असताना रसिकांना बोलीभाषांचा गोडवा अनुभवता यावा, म्हणून बोलीभाषांच्या व्हिडिओची मालिका पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. त्या मालिकेत
युनायटेड वेस्टर्न बँक कोणतीही बँक अडचणीत येणे आणि बंद पडणे अथवा अन्य बँकेत विलीनीकरण करणे ही बँकिंग व्यवसायाच्या आणि गुंतवणुकदारांच्या दृष्टीने दुःखाची गोष्ट आहे. युनायटेड वेस्टर्न बँकसारखी एक चांगली बँक लयाला जाणे ही नक्कीच दुःखाची बाब आहे. या बँकेचा उदय, उत्कर्ष आणि अस्त अशा तीन टप्प्यांवर अरुण गोडबोले यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language